www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बाजाराच्या सुरुवातीलाच सेन्सेक्सनं भरारी घेत 22 हजाराचा उच्चांकी आकडा गाठला आहे. शेअर बाजाराचा हा आतापर्यंतचा सर्वात उच्चांकी आकडा ठरला आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर एनडीएची सत्ता येणार, अशी शक्यता काही सर्वेंमधून पुढे आली आहे. यानंतर बाजारावर त्याचा परिणाम होत असल्याचं जाणकारांनी म्हटलं आहे.
चालू खात्यावर कमी झालेली तूट, परदेशी गुंतवणूकदारांचा वाढता ओघ या प्रमुख कारणामुळे बाजार तेजीत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.