www.24taas.com, झी मीडिया
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या महाराष्ट्रातील उर्वरित 14 जागांवरील उमेदवारांची घोषणा 12 किंवा 13 मार्चपर्यंत होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन महासंघ रिपब्लिकन पक्षाबरोबर आघाडी करण्यापासून काँग्रेसचे दूर जात असल्याचं चित्र आहे.
त्यामुळे पालघर व अकोला या दोन मतदारसंघांतही कॉंग्रेसतर्फेच उमेदवार उभे करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्रातील उर्वरित उमेदवारांच्या यादीबाबत काल आणि आजही छाननी समितीमध्ये चर्चा झाली असल्याचं सांगण्यात येत आहे.
काँग्रेसच्या वर्तुळातून समजलेल्या माहितीनुसार, शेवटच्या टप्प्यात आलेल्या संभाव्य यादीतील नावे पुढीलप्रमाणे:
१) गडचिरोली-आमदार डॉ. नामदेवराव उसंडी आणि मारोतवार कोवासे (विद्यमान खासदार),
२) चंद्रपूर-संजय देवतळे आणि वामनराव कासावार, यवतमाळ-माणिकराव ठाकरे,
३) नांदेड-अमिता अशोक चव्हाण, हिंगोली- युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव सातव,
४) पालघर- राजेंद्र गावित, भिवंडी-विश्वनाथ पाटील,
५) विद्यमान खासदार सुरेश तावरे किंवा मुजफ्फर हुसेन,
६) पुणे-मोहन जोशी आणि विश्वजित कदम आणि
७) हातकणंगले- कल्लाप्पाण्णा आवाडे वरील नावांपैकी संजय देवतळे यांना उमेदवारी मिळणे जवळपास निश्चित मानले जाते.
हातकणंगल्याची जागा राष्ट्रवादीने काँग्रेसला दिल्यानंतर कल्लाप्पाण्णा आवाडे यांची उमेदवारी जवळपास हमखास मानली जात होती व सध्याचे चित्र तसेच आहे.
यवतमाळमधून माणिकराव ठाकरे यांनाच लढण्यासाठी दबाव आहे; परंतु ते त्यांचे चिरंजीव राहुल यांच्यासाठी आग्रही असल्याचे समजते.
नांदेडमधून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता यांना उमेदवारी मिळण्याचेही जवळपास निश्चित आहे.
पालघर मतदारसंघ हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीसाठी सोडण्याचे काँग्रेसने जाहीर केले होते. गेल्या निवडणुकीत या मतदारसंघातून निवडून आलेले बळिराम जाधव कॉंग्रेसचे सहयोगी सदस्य म्हणून लोकसभेत बसत होते.
परंतु शेवटच्या क्षणी या पक्षाने काँग्रेसबरोबर हातमिळवणी करण्याचे नाकारले आणि त्यामुळे आता येथून राजेंद्र गावित यांची उमेदवारी निश्चित मानली जाते.
प्रकाश आंबेडकर आणि जोगेंद्र कवाडे या रिपब्लिकन पक्षाच्या दोन गटांबरोबरही काँग्रेसचा समझोता होऊ शकलेला नाही. याचे नुकसान कॉंग्रेसला सहन करावे लागण्याची शक्यता आहे.
प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी अकोला मतदारसंघ सोडण्याची कॉंग्रेसची तयारी होती; परंतु आता समझोता न झाल्याने काँग्रेसला तेथे उमेदवार शोधावा लागेल.
लोकसभेच्या उमेदवारांमध्ये एकाही मुस्लिम उमेदवाराचा समावेश नाही. परंतु अलीकडेच राज्यसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातून हुसेन दलवाई यांची निवड करण्यात आल्याने लोकसभेच्या उमेदवारांत मुस्लिम उमेदवार नसला तरी चालेल असा विचार काँग्रेसमधून व्यक्त करण्यात येत असल्याचे समजले.
भिवंडीसाठी कॉंग्रेसमध्ये नुकतेच प्रवेश केलेले कुणबी सेनेचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील, तसेच विद्यमान खासदार सुरेश तावरे यांची नावे आहेत. परंतु मुजफ्फर हुसेन यांच्या नावाचीही चर्चा असल्याचे सांगण्यात येते.
पुण्यात मोहन जोशी व पतंगराव कदम यांचे चिरंजीव विश्वजित यांच्यात चढाओढ आहे. विद्यमान खासदार सुरेश कलमाडी यांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी देण्याच्या कल्पनेबाबत पक्षश्रेष्ठी अद्याप अनुकूल नसल्याचे सांगितले जाते.
औरंगाबाद आणि जालना या दोन शेजारी असलेल्या मतदारसंघांबाबतही पक्षापुडे काहीसा पेच दिसून येतो. औरंगाबादहून राज्यात मंत्री असलेले राजेंद्र दर्डा यांना निवडणूक लढविण्यासाठी आग्रह केला जात असल्याचे सांगितले जाते.
केशवराव औताडे यांच्या चिरंजीवांचे नावही औरंगाबाद किंवा जालन्याच्या जागेसाठी विचारात घेतले जात असल्याचे समजते.
विधान परिषदेसाठी तीन नावे विधानसभेतून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या तीन जागांसाठी कॉंग्रेसने विद्यमान सभापती शिवाजारीव देशमुख, चंद्रकांत रघुवंशी आणि हरिभाऊ राठोड यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केल्याचे सांगण्यात आले.
हरिभाऊ राठोड यांनी 2008 मध्ये भाजपमधून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. भटक्या व विमुक्तांच्या अधिकारासाठी त्यांनी मोहिमा काढल्या. यवतमाळमधून त्यांनी लोकसभेची उमेदवारीही मागितलेली होती.
परंतु आता त्यांना विधान परिषदेची उमेदवार