www.24taas.com, झी मीडिया,मुंबई
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी एकत्र येवू नये असं सांगत रिपब्लीकन पार्टीचे नेते रामदास आठवलेंनी पुन्हा कोलांटउडी घेतलीय.
उद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्र यावे अशी हाक रामदामदास आठवले यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. सुरूवातीला महाआघाडीत घेण्यास आठवले यांनी राज ठाकरेंना विरोध केला होता. त्यानंतर त्यांनी आपली भूमिका बदलली आणि दोन्ही भावांनी एकत्र यावे, असे म्हणत मनसेला महाआघाडीसाठी टाळी दिली होती. मात्र, राज यांनी टाळी देण्याचे टाळले होते. पुन्हा आठवले यांनी आपली भूमिका बदल कोलांटउडी मारली.
माझा समाचार घेतला आता शिवसेना नेत्यांचाही घ्यावा, असा रामदास आठवलेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. शिवसेना नेते रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी उद्धव आणि राज या ठाकरे बंधुनी एकत्र यावे, असे आवाहन केले होते. हाच धागा पकडून आठवले यांनी उद्धव यांना टोला लगावलाय.
दरम्यान, आज भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून मनसे महायुतीत येण्यासंदर्भातल्या चर्चा रंगत आहे. आता या भेटीमुळं मनसे टाळी देण्याच्या चर्चेला पुन्हा जोर चढलाय. मात्र या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका, असं आवाहन फडणवीसांनी केलंय. ही केवळ सदिच्छा भेट होती, असा दावाही त्यांनी केलाय. त्यानंतर आठवले यांनी आपला सूर बदल शिवसेना आणि मनसे यांनी एकत्र येऊ नये, असे ते म्हणालेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.