मुंबई : मुंबईच्या विकासाच्या नावाखाली चक्क मुंबईलाच विकायला काढल्याचे दिसत आहे. नविन विकास आरखड्यानुसार वाढीव चटईक्षेत्र (एफएसआय) ८ पर्यंत वाढवण्याचे सुचविण्यात आले आहे. तसेच आरेला आरक्षणातून मुक्त करण्यात आल्यामुळे बिल्डर लोकांना मोकळे रान मिळणार आहे.
मुंबई शहर विकासाला चालना देण्यासाठी २०३४ पर्यंतच्या विकास आराखड्याला महापालिकेत मान्यता देण्यात आली आहे. सध्या झोपडपट्टी पुनर्विकास अंतर्गत ४ एफएसआय, मिळतो. शहरात १.३३ एफएसआय, , उपनगर टीडीआर धरुन २ एफएसआय, तर म्हासाठी ३ एफएसआय, देण्यात येता. आता ०.१५ पासून ८ एफएसआय, देण्यात येणार आहे. जेथे एफएसआयची जास्त आवश्यता आहे. या ठिकाणी जादा एफएसआय देण्याची तरदूत करण्यात आली आहे.
दादर पूर्व, पश्चिम, अंधेरी आदी ठिकाणी ८ तर शिवाजी पार्क, काळबादेवी ते विधानभवनापर्यंत ६.५ एफएसआय वापरण्यास मिळणार आहे. त्यामुळे बिल्डर लोकांना याचा जास्त फायदा होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.