मुंबईत दुसऱ्या दिवशी आणखी एक सिलिंडर स्फोट, ८ जखमी

कुर्ल्यातील सिटीकिनारा रेस्टॉरंटमध्ये सिलिंडर स्फोटात ८ ठार झाल्याच्या दुर्दैवी घटना काल घडली असताना आज दुसऱ्या दिवशी विक्रोळीतील पार्कसाईट येथे एका घरात सिलिंडर स्फोट झाला. यात ८ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. 

Updated: Oct 17, 2015, 03:14 PM IST
मुंबईत दुसऱ्या दिवशी आणखी एक सिलिंडर स्फोट, ८ जखमी title=

मुंबई : कुर्ल्यातील सिटीकिनारा रेस्टॉरंटमध्ये सिलिंडर स्फोटात ८ ठार झाल्याच्या दुर्दैवी घटना काल घडली असताना आज दुसऱ्या दिवशी विक्रोळीतील पार्कसाईट येथे एका घरात सिलिंडर स्फोट झाला. यात ८ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. 

अधिक वाचा : मुंबईत सिलिंडरचा स्फोट, आठ ठार

विक्रोळीतील पार्कसाईट परिसरातील वर्षानगर भागातील आंबेडकरनगर सोसायटीत सकाळी ही दुर्घटना घडली. जखमींवर राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

घरगुती सिलिंडर लीक होऊन आग लागली आणि त्यातच स्फोट झाला. हे घर रस्त्याला लागून आहे. घरातील काही लोक आणि पादचारीही यात जखमी झालेत. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवल्यात यश आले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.   

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.