मुंबई-गोवा हायवेसोबत सागरी मार्गही होईल - गडकरी

अत्याधुनिक मुंबई -गोवा हायवे बरोबरच सागरी महामार्गाचे कामही तातडीने पूर्ण करण्यात येईल अशी माहिती केंद्रीय  भू-पुष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गोव्यात दिलीय . राष्ट्रीय महामार्ग १७ च्या चौपदरीकरणाच्या कामाचा शुभारंभ गडकरी यांच्या हस्ते झाला यावेळी ते बोलत होते. 

Updated: Dec 22, 2016, 09:17 PM IST
 मुंबई-गोवा हायवेसोबत सागरी मार्गही होईल - गडकरी title=

मुंबई : अत्याधुनिक मुंबई -गोवा हायवे बरोबरच सागरी महामार्गाचे कामही तातडीने पूर्ण करण्यात येईल अशी माहिती केंद्रीय  भू-पुष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गोव्यात दिलीय . राष्ट्रीय महामार्ग १७ च्या चौपदरीकरणाच्या कामाचा शुभारंभ गडकरी यांच्या हस्ते झाला यावेळी ते बोलत होते. 

मुंबई -गोवा आणि गोवा मेंगलोर या राष्ट्रीय महामार्गाचे सर्व साधनसुविधांसह चौपदरीकरण करण्यात येत आहे . यातल्या राष्ट्रीय महामार्ग १७ मधील पत्रादेवी ते पणजी आणि पणजी ते बांबोळी या मार्गच्या चौपदरीकरणाच्या कामाचा शुभारंभ   केंद्रीय  भू-पुष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाला.

 यावेळी केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर गोव्याचे मुख्यमंत्री लक्षमिकांत पार्सेकर उपस्थित होते . या एक हजार ३०२ कोटींच्या कामाचा शुभांरभ प्रसंगी बोलताना गडकरी म्हणाले महाराष्ट्र आणि गोव्याच्या विकासाच्या दृष्टीने मुंबई - गोवा या महामार्ग महत्वाचा आहे. 
 
 अत्याधुनिक सुविधा असणारा हा महामार्ग बनविणायचे काम आता जोरात सुरु झाले आहे . २०१८ पर्यंत ते पूर्ण होईल . त्याबरोबरच मुंबई गोवा या राष्ट्रीय महामार्गाचे कामही हाती घेण्यात येणार आहे. 
 
 एकूण २२ फेज मधील या कामांपैकी १८ ची कामे सुरु आहेत . या मार्गात २२ उडडन पूले येत असून देवास - करंजा या सागरी ब्रिज चे कामही लवकरच हाती घेण्यात येणार आहे अशी माहिती  केंद्रीय  भू-पुष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिलीय .