'देशात गरिबांना न्याय मिळत नाही' - सत्यपाल सिंह

सत्र न्यायालयाने सलमानला दिलेल्या शिक्षेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि भाजपचे खासदार डॉ. सत्यपाल सिंह यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

Updated: May 8, 2015, 02:49 PM IST
'देशात गरिबांना न्याय मिळत नाही' - सत्यपाल सिंह title=

मुंबई : सत्र न्यायालयाने सलमानला दिलेल्या शिक्षेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि भाजपचे खासदार डॉ. सत्यपाल सिंह यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

भारतात गरिबांना न्याय मिळत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं असं ते म्हटले आहेत. त्यांनी आर्थिकदृष्ट्या बळकट आणि न्याय व्यवस्था यांच्या हितसंबधावर टीका केली आहे. पैशाच्या जोरावर श्रीमंत लोक न्यायव्यवस्थेच्या हातावर तुरी देतात, असं मतं सत्यपाल सिंह यांनी व्यक्त केलं आहे. 

सत्र न्यायलयाने दिलेल्या निर्णयामुळे न्याय व्यवस्थेवर जनसामान्यांचा विश्वास निर्माण झाला होता, मात्र उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने त्या विश्वासाला पुन्हा एकता तडा गेला आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केलं आहे. 

सत्र न्यायलयाने दिलेल्या निर्णयामुळे न्यायव्यवस्थेवर जनसामान्यांचा विश्वास निर्माण झाला होता, मात्र उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने त्या विश्वासाल पुन्हा एकता तडा गेला आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.