तर मग मी मुसलमान नाही : सलीम खान

ढाका येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध सलीम खान यांनी केला. या हल्ल्यामागे मुसलमान असतील तर मग मी मुसलमान नाही, असे त्यांनी यासंदर्भातील आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

Updated: Jul 5, 2016, 06:44 PM IST
तर मग मी मुसलमान नाही : सलीम खान title=

मुंबई : ढाका येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध सलीम खान यांनी केला. या हल्ल्यामागे मुसलमान असतील तर मग मी मुसलमान नाही, असे त्यांनी यासंदर्भातील आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

दरम्यान, त्यांनी अशा भ्याड हल्ल्यांचा निंदेशिवाय आपली प्रार्थना अपूर्ण राहील, अशी प्रतिज्ञा या ईदला करू, असा संदेश सलीम खान यांनी ट्विट द्वारे दिला आहे. निष्पापांचा बळी घेणे हे मानवतेचा खून करण्यासारखे असल्याचे पैगंबरांनी म्हटले आहे. तसे त्यांनी याच ट्विटमध्ये म्हटले आहे. सलीम खान यांनी ढाका हल्ल्याबाबत चार ट्विट्स केलीत.

जगभरात सतत अशा प्रकारच्या कारवाया करणारे लोक स्वत:ला मुसलमान म्हणत असल्याचे त्यांनी सुरुवातीच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. एक सच्चा मुसलमान होण्यासाठी पैंगबर आणि कुराणाचे अनुकरण करावे लागते. या व्यक्ती कशाचे अनुकरण करतात हे मला ठाऊक नाही. परंतु, नक्कीच ते इस्लामचे अनुकरण करत नसल्याचे लगेचच केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.