ग्रामीण विकासाबरोबर रस्ते, रेल्वे, जेटी विकासाला प्राधान्य - अर्थमंत्री

जनतेच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवायचा आहे, अशी घोषणा करत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवरा यांनी अर्थसंकल्प सादर करण्यास केली सुरुवात केली. रस्ते, रेल्वे मार्ग विकासाबरोबर ग्रामीण विकासावर भर दिला. तसेच सागरी रस्ते विकासाबरोबरच जेटी सुधारण्यावर भर देण्यात येणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. केंद्र शासनाच्या धर्तीवर मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, खासदारांप्रमाणे आमदारांनी आदर्श गावासाठी गाव दत्तक घेण्यावर भर देण्यात आलाय.

Updated: Mar 18, 2015, 03:55 PM IST
ग्रामीण विकासाबरोबर रस्ते, रेल्वे, जेटी विकासाला प्राधान्य - अर्थमंत्री title=

मुंबई : जनतेच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवायचा आहे, अशी घोषणा करत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवरा यांनी अर्थसंकल्प सादर करण्यास केली सुरुवात केली. रस्ते, रेल्वे मार्ग विकासाबरोबर ग्रामीण विकासावर भर दिला. तसेच सागरी रस्ते विकासाबरोबरच जेटी सुधारण्यावर भर देण्यात येणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. केंद्र शासनाच्या धर्तीवर मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, खासदारांप्रमाणे आमदारांनी आदर्श गावासाठी गाव दत्तक घेण्यावर भर देण्यात आलाय.

राज्यावर ३ लाख कोटी रुपयांचे कर्ज  आहे. त्यामुळे जनतेच्या मनातले विकासाचं स्वप्न साकारताना आव्हानाला सामोरं जावं लागणार आहे. असे असले तरी सर्व अपेक्षा पूर्ण करणारा अर्थसंकल्प असेल, असे मुनगंटीवार म्हणालेत. चांद्यापासून बांद्यापर्यंत राज्य सुजलाम सुफलाम करणार आहोत. राज्याला सध्या  व्याजापोटी २४ हजार कोटी द्यावे लागत आहेत. मात्र,  उपाय योजनांचा बोजा सर्व सामान्यांवर पडणार नाही. खर्चावर नियंत्रण ठेवण्यावर सरकारचा निर्णय  आहे, असे मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही मनाला वेदना देणारी बाब आहे. २ लाख २३ हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा सरकारने विचार केला आहे. तर ४ हजार कोटींचे अर्थसाह्य शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी जलयुक्त शिवार अभियान सुरु करण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांना दिलेली ही मदत कमी आहे.  त्यामुळे सावकारी कर्जमुक्ती करण्यासाठी फडणवीस सरकारची योजना आहे. त्यासाठी सावकारी कर्जासाठी सरकारवर १७१ कोटी भरणार आहे. तर अवकाळी पावसाने प्रभावीत शेतकऱ्यांना मदत करण्यात येणार आहे, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

सर्व योजनांवर सरकारचे बारकाईने लक्ष आहे. कोणतेही घोटाळे होणार नाही. चांगल्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देणार आहोत. तसेच मंत्रालयात मॉनेटरिंग कक्ष उभारण्यात येणार आहे. तसेच साखळी सिंमेंट बंधाऱ्यांसाठी ५०० कोटी रुपये देणार आहे.

यांत्रिकरणांसाठी शेतकऱ्यांना मदत करणार  आहे आणि  मोतीराम लहाने कृषी संजीवनी योजनेसाठी ५० कोटी रुपये दिले जातील.  सुक्ष्म सिंचनासाठी ३३० कोटी रुपयांची योजना असून सुक्ष्म सिंचनाखाली १६ लाख हेक्टर जमीन आली आहे. शेतीला पाणी देण्यासाठी सरकारची योजना आहे. तर कृषी पंपासाठी १०३९ कोटी रुपयांची योजना असेल. शेतकऱ्यांना ७५४० सौर पंप  बसविण्यात येणार आहेत. तसेच द्राक्ष बागायतदारांना शेडनेट देणार असून कृषी विकासाचा दर ४ टक्के करण्याचे ध्येय असेल. नाला बंडिंगसाठी १ हजार कोटी देणार आहोत, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

राज्य रोजगार हमी योजनेसाठी ७०० कोटी, मनरेगात राज्याचा वाटा १ हजार ९४८ कोटी, कोकणात जेट्टींसाठी २० कोटींची तरतूद,  बी संवर्धनासाठी १० कोटींची योजना, चारा नियोजनासाठी १४० कोटींची तरतूद तर रखडलेल्या सिंचन प्रकल्पांसाठी वित्तिय नियोजन, ५ वर्षात ५० टक्के सिंचन प्रकल्प पूर्ण होणार आहेत.

बजेटमधील ठळक बाबी...
- मुख्यमंत्री ग्रामीण मार्ग योजना राबविणार 
- २४१३ कोटी मुख्यमंत्री ग्रामीण मार्ग योजना देणार 
- फडणवीस सरकारची महत्त्वाकांक्षी योजना
- जलसंपदेसाठी ७,२७२ कोटींची तरतूद
- ग्रामीण मार्ग योजनेची जबाबदारी सहा महिन्यांवरून ५ वर्ष करणार 
- ६० हजार हेक्टर जमीन ओलिताखाली आणणार
- रोहयो योजनेसाठी ७०० कोटी
- आमदार आदर्श ग्राम योजना सुरू करणार
- केंद्राच्या धर्तीवर आमदार आदर्श ग्राम योजना 
- एका आमदारानं तीन गावं आदर्श करावीत अशी अपेक्षा
- आमदार निधीच्या ५० टक्के निधी सरकार देणार 
- राज्य महामार्गासाठी ३ हजार कोटी तरतूद
- केंद्राच्या मदतीने राज्याचे रस्त्यांचा विकास करणार 
- जलविद्युत प्रकल्पांसाठी ९०० कोटी 
- आमदार आदर्श ग्राम योजनेसाठी २५ कोटींचीी तरतूद
- वीज निर्मिती प्रकल्पांसाठी ५३४ कोटींची तरतूद
- भारत माता माझी आई, पण डोकं ठेवायला जागा नाही
- पंडीत दिनदयाळ उपाध्याय जागा खरेदी योजना 
- दारिद्र्यरेषेखालील लोकांसाठी घरकुल योजना
- राज्यात २ लाख १४ हजार लोकांना घरं नाही
- जागा खरेदी करण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला ५० हजार रुपये, २०० कोटींची तरतूद
- मुंबई मेट्रो ३ साठी १०९ कोटी ६० लाखांची तरतूद
- २०२२ पर्यंत प्रत्येकाला घर देणार 
- पुणे मेट्रोला १७५ कोटींची तरतूद
- नागपूर मेट्रोला १९८ कोटींची तरतूद
- नाशिक, पुणे, मुंबई, औरंगाबाद, अमरावती, येथील बस स्थानकांचे नुतनीकरण करणार 
बस खरेदी आणि नूतनीकरणासाठी १२५ कोटी

- महिलांसाठी इ टॅक्सीसाठी अनुदान देणार 
- स्मार्ट सीटीसाठी २६८ कोटी देणार 
- वीज वितरणासाठी ५३८ कोटी 

राज्यातील रेल्वे प्रकल्पांना गती देणार
- तीर्थक्षेत्रासाठी अतिरिक्त १२५ कोटींची तरतूद
- कामठीमध्ये बाबासाहेब अध्यासन स्मारक 
- स्मारक आणि प्रशिक्षण संस्था
- आंबेडकर स्मारकासाठी १० कोटींची तरतूद
- सागरी किनारा पर्यटन विकासाठी ४२ कोटी 
- कुंभमेळ्यासाठी १२७८ कोटींची तरतूद
 
- रायगडावर रायगड महोत्सव सुरू करणार
- गड किल्ले संवर्धनासाठी ५० कोटी 
- सागंरी पर्यटन विकासाठी ४२ कोटी
- कुंभमेळ्यासाठी २३७८ कोटींची तरतूद
- वायफाय फ्री- मुंबईत काही ठिकाणी वायफाय फ्री होणार 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.