आरपीएफच्या प्रसंगावधानामुळे वाचले मायलेकींचे प्राण

मध्य रेल्वेच्या कुर्ला स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर सातवर ट्रेनमध्ये चढणा-या दोन प्रवाशांचे प्राण कुर्ला आरपीएफच्या दोन जवानांनी वाचवले. 

Updated: Dec 20, 2016, 01:55 PM IST
आरपीएफच्या प्रसंगावधानामुळे वाचले मायलेकींचे प्राण title=

कुर्ला : मध्य रेल्वेच्या कुर्ला स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर सातवर ट्रेनमध्ये चढणा-या दोन प्रवाशांचे प्राण कुर्ला आरपीएफच्या दोन जवानांनी वाचवले. 

कुर्ल्याहून मानखुर्दकडे जाण्यासाठी एक महिला आणि तिची मुलगी ट्रेनमध्ये चढत असताना गाडी सुरु झाली. आणि त्यात ती मुलगी गाडी खाली जाणार इतक्यात आरपीएफच्या प्रमोद गीते यांनी प्रसंगावधान दाखवून त्या मुलीला ट्रेन खाली जात असताना बाहेर ओढले. तर तिच्या आईचे प्राण ही कर्तव्यावर असलेले विकास पाटील यांनी त्या महिलेला गाडी खाली जाण्या पासून वाचवले.

विकास पाटील आणि प्रमोद गीते हे दोघंही बंदोबस्तासाठी असताना समोर घडणा-या घटनेला क्षणाचा ही विलंब न लावता दोंघाचे प्राण वाचवले. मात्र, छोटोशी घाई आणि चूक या मायलेकींच्या जीवावर बेतणार होती. या दोन पोलिसांनी त्यांचे जीव वाचवले.