मुंबई : शहरातील गिरण्यांच्या जागेवर असणा-या चाळींना फंजिबल एफएसआय देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद फडणवीस सरकारनं घेतलाय. त्यामुळं या चाळीतल्या रहिवाशांना आता ३०० चौरस फुटाऐवजी ४०५ चौरस फुटाची घरे मिळतील.
मुंबईतील परळ, लालबाग, भायखळा, नायगाव, चिंचपोकळीसह गिरणगाव परिसरात असणाऱ्या बॉम्बे डाईंग, टाटा, श्रीराम मिलसह अनेक मिलच्या जागांवर या चाळी आहेत. या चाळींचा पुनर्विकास रखडला होता. मात्र या निर्णयामुळं या चाळीत राहणा-या 6 ते 7 हजार कुटुंबांना 405 चौरस फुटाची घरे मिळणार आहेत.