मुंबई महापालिकेत १५ जागांसाठी भरती

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तीनही प्रमुख रूग्णालय आणि उपनगरीय रूग्णालयांच्या आस्थापनेवरील रक्त संक्रमण अधिकारी या संवर्गातील पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 24, 2013, 12:16 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तीनही प्रमुख रूग्णालय आणि उपनगरीय रूग्णालयांच्या आस्थापनेवरील रक्त संक्रमण अधिकारी या संवर्गातील पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहे.
पदांची संख्या आणि आरक्षणः एकूण १५ पदे
रा.ए. स्मा-०४, लोटीमस-०२, नायर-०२, भाभा-०१, कूपर-०३, भगवती-०१ आणि राजावाडी-०२
दि. २७ सप्टेंबर २०१३ रोजी भरतीसाठी अधिष्ठाता, लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रूग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय यांचे कार्यालय, शीव (सायन्स) मुंबई – ४०००२२ या पत्यावर खुला प्रवर्गातील उमेदवारांनी सकाळी ११.०० ते दुपारी १.००वाजेपर्यंत तर मागस प्रवर्गातील उमेदवारांनी दुपारी २.०० ते ४.०० वाजेपर्यंत उपस्थित राहावयाचे आहे, असे उपआयुक्त यांनी जाहिरातीद्वारे कळविले आहे.
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा....

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.