भारतीय तटरक्षक दलात नोकरीची सुवर्णसंधी...

भारतीय तटरक्षक दलामध्ये एकूण सतरा पदं भरण्यात येणार आहे. त्यामुळे तटरक्षक दलात काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या तरूणांना नक्कीच सुवर्ण संधी आहे.

Updated: Mar 16, 2013, 08:27 AM IST

www.24taas.com, मुंबई
भारतीय तटरक्षक दलामध्ये एकूण सतरा पदं भरण्यात येणार आहे. त्यामुळे तटरक्षक दलात काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या तरूणांना नक्कीच सुवर्ण संधी आहे. भारतीय तटरक्षक दलात एमटी वाहनचालक (12 जागा) रिक्त आहे. त्यातील महत्त्वाच्या अटी म्हणजे, तुम्ही दहावी पास असणं गरजेचं आहे. त्यानंतर वाहन चालविण्याच्या दोन वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. त्याचसोबत तुमच्याकजे अवजड वाहन आणि इतर वाहनांचे लायसन्स असणे गरजेचे आहे. वाहनचालक पदासाठी तुम्हांला ५२०० ते २०२०० एवढा पगार असेल.
भारतीय तटरक्षक दलात अनेक पदे रिक्त आहेत. अनेक विभागासाठी तटरक्षक दलात संधी आहे. भांडारपाल (2 जागा), एमटी फिटर (1 जागा), सहायक भांडारपाल (1 जागा), ड्राफ्टसमन (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.

अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 2 एप्रिल २०१३ आहे. अधिक माहिती http://www.indiancoastguard.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.