LIC मध्ये जॉब हवाय... ७५० पदं रिक्त

भारतीय जीवन विमा महामंडळात (LIC) सहायक प्रशासकीय अधिकारीच्या 750 जागा भरतीसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे अनेक मराठी तरूणांना या निमित्ताने नवीन संधी मिळणार आहे.

Updated: Mar 16, 2013, 08:27 AM IST

www.24taas.com, मुंबई
भारतीय जीवन विमा महामंडळात (LIC) सहायक प्रशासकीय अधिकारीच्या 750 जागा भरतीसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे अनेक मराठी तरूणांना या निमित्ताने नवीन संधी मिळणार आहे.
भारतीय जीवन विमा महामंडळात सहायक प्रशासकीय अधिकारी (750 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १ एप्रिल २०१३ आहे.
यासंबंधीचा जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 9-15 मार्च २०१३ या कालावधीत प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.licindia.in/careers.htm या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.