खुशखबर ! तुमचा होमलोनचा हफ्ता कमी होणार!

भारतीय रिझर्व्ह बँकेने बुधवारी रेपो रेट २५ बेसिस पाँईंटने कमी करण्याची घोषणा केली. यामुळे  रेपो रेट तात्काळ कमी होऊन ७.५ टक्के झाला आहे.

Updated: Mar 4, 2015, 03:29 PM IST
खुशखबर ! तुमचा होमलोनचा हफ्ता कमी होणार! title=

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने बुधवारी रेपो रेट २५ बेसिस पाँईंटने कमी करण्याची घोषणा केली. यामुळे  रेपो रेट तात्काळ कमी होऊन ७.५ टक्के झाला आहे.

बँका रिझर्व्ह बँकेकडून पैस घेतात, त्या पैशांवर जे व्याज चुकवलं, जातं तो रेपो रेट असतो.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजयन यांनी ही घोषणा केल्यानंतर सेन्सेक्स पहिल्यांदा ३० हजारांच्या ऐतिहासिक उंचीवर जाऊन पोहोचला.

रेपो रेटमध्ये ही कपात दोन महिन्याच्या आत दोन वेळेस झाली आहे.

रेपो रेट कमी झाल्याने बँका आपल्या व्याजदरांमध्ये कपात करू शकतात. यामुळे बँकाकडून घेतलेल्या कर्जावरील हफ्ते कमी होऊ शकतात, कारण त्यावरील व्याजदर हे खाली येतील.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.