महाविद्यालयांत प्रवेशांसाठी विद्यार्थ्यांची 'रॅट रेस'

अकरावी प्रवेशासाठीची पहिली यादी आली आणि दहवीच्या परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या टेन्शनला पुन्हा एकदा सुरुवात झाली.

Updated: Jul 5, 2014, 10:44 PM IST
महाविद्यालयांत प्रवेशांसाठी विद्यार्थ्यांची 'रॅट रेस' title=
प्रातिनिधिक फोटो

मुंबई : अकरावी प्रवेशासाठीची पहिली यादी आली आणि दहवीच्या परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या टेन्शनला पुन्हा एकदा सुरुवात झाली.

हव्या त्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांची धडपड सुरु आहे. पण ही ‘रॅट रेस’ इतकी भयानक आहे की 90 टक्क्यांपेक्षाही जास्त मार्त मिळालेल्यांचंही पहिल्या लिस्टमध्ये नाव नाही.   

दहावीत तब्बल 92.02 टक्के मिळालेली आयेषा शुक्ला... तिला सायन्सला अॅडमिशन घ्यायचीय. तब्बल 92.02 टक्के मिळवूनही तिला हव्या त्या कॉलेजच्या पहिल्या यादीत तिचं नावच नाही. फक्त आयेषाच नव्हे तर लाखो विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचं कॉलेज मिळत नाहीय. त्यामुळे विद्यार्थ्यांचं आणि पालकांचंही टेन्शन वाढलंय. 

गेल्या वर्षीच्या तुलनेत आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स या तीनही शाखेचा कट ऑफ हा एका टक्यानं वाढलाय. पण सारखी टक्केवारी असलेले शेकडो विद्यार्थी असल्यानं स्पर्धाही प्रचंड वाढलीय. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आवडत्या कॉलेजला अॅडमिशन नाही मिळालं तरी जिथे प्रवेश घ्याल तिथे मन लावून अभ्यास करावा, असं रुईया महाविद्यालयाचे प्राचार्य सुहास पेडणेकर यांनी म्हटलंय.  

चांगल्या कॉलेजमध्येच अॅडमिशन मिळावी, यासाठी लाखो विद्यार्थी रेसमध्ये आहेत. अॅडमिशन मिळालीच तर स्पर्धेत टिकून राहण्याचंही आव्हान मोठं आहे. पण कॉलेज कुठलंही असो, अभ्यास केला आणि मेहनत केली की यश आपोआप मिळतंच. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.