रामराजे निंबाळकर विधान परिषदेच्या सभापतीपदी बिनविरोध

Updated: Mar 20, 2015, 06:12 PM IST
रामराजे निंबाळकर विधान परिषदेच्या सभापतीपदी बिनविरोध title=

मुंबई विधान परिषदेच्या सभापतीपदी शुक्रवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रामराजे निंबाळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या राजकारणाला पूर्णविराम मिळाला आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार सुनील तटकरे यांनी रामराजे निंबाळकर यांच्या उमेदवारीचा प्रस्ताव मांडला आणि पक्षाचे नेते जयदेव गायकवाड यांनी त्याला अनुमोदन दिले. या प्रस्तावाला कोणीही विरोध न केल्यामुळे त्यांची एकमताने निवड करण्यात आली. 

दरम्यान, विधानपरिषद सभापती निवडणुकीतून शिवसेनेने अचानक माघार घेतली. शिवसेनेने नेत्या निलम गोऱ्हे यांना उमेदवारी देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे भाजप-शिवसेना वाद पुन्हा एकदा समोर आला. मात्र, आज सकाळी अचनाक गोऱ्हे यांनी उमेवारी मागे घेतल्याचे जाहीर केले. 

रामराजे निंबाळकर यांच्याविषयी थोडंसं...
शिवाजीराव देशमुख यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर, आता रामराजे निंबाळकर यांच्याकडे विधानपरिषद सभापतीपदी निवड झालीये.  फलटणचे आमदार असलेले रामराजे निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आहेत. फलटणमधून 1995 साली ते पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडून आले, त्यानंतर त्यांनी युती सरकारच्या काळात राज्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळला. 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर, ते राष्ट्रवादीत दाखल झाले. 1995 पासून ते 2009 सालापर्यंत ते फलटणचे आमदार होते. 2009 साली मतदारसंघ राखीव झाल्यानंतर, त्यांची विधान परिषदेत वर्णी लागली. शरद पवार यांचे निकटवर्तीय अशीही त्यांची ओळख आहे. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी जलसंपदा विभागाचा कृष्णा खोरेचा कार्यभारही सांभाळला.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.