राम कदम यांना मनसेचे दिलीप लांडे देणार टक्कर

घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मनसेच्यावतीने नगरसेवक दिलीप लांडे हे राम कदम यांच्याविरोधात मैदानात उतरणार आहेत. गेल्या दोन वर्षांपासून विभाग अध्यक्ष म्हणून केलेल्या कामाच्या जोरावर घाटकोपर पश्चिममधली जनता आपल्यालाच निवडून देईल, असा विश्वास लांडे यांनी व्यक्त केलाय. 

Updated: Sep 18, 2014, 08:47 PM IST
राम कदम यांना मनसेचे दिलीप लांडे देणार टक्कर title=

मुंबई : घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मनसेच्यावतीने नगरसेवक दिलीप लांडे हे राम कदम यांच्याविरोधात मैदानात उतरणार आहेत. गेल्या दोन वर्षांपासून विभाग अध्यक्ष म्हणून केलेल्या कामाच्या जोरावर घाटकोपर पश्चिममधली जनता आपल्यालाच निवडून देईल, असा विश्वास लांडे यांनी व्यक्त केलाय. 

तसंच  घाटकोपर पश्चिम हा मनसेच्या विचारांना मानणारा मतदारसंघ असल्याचंही दिलीप लांडे यांनी म्हटलंय. राम कदम यांना भाजपकडून तिकिट मिळणार का, याची उत्सुकता आहे. त्यातच महायुतीबाबत निर्णय लांबल्याने लक्ष लागले आहे.

राम कदम भाजपामध्ये प्रवेश केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसलाय. त्याआधी औरंगाबादमधले हर्षवर्धन जाधव यांनी मनसेला धक्का दिला होता. मनसे आमदार राम कदम भाजपमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थित पुण्यात प्रवेश केला. भाजपा अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेण्यासाठी ते राम कदम पुण्याकडे रवाना झाल्यानंतर ते प्रवेश हे निश्चित झाले होते.

गेल्या काही दिवसांपासून राम कदम हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर नाराज असल्याची चर्चा होती. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.