मुंबई : मूळचा मराठी असलेला मात्र दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणारा सुपरस्टार रजनीकांत यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरवण्यात यावं अशी मागणी भाजप आमदार अनिल गोटे यांनी केलीय.
गेल्या तीन दशकांपासून रजनीकांतनं केवळ तामिळ सिनेमावरच नव्हे तर तेलुगू आणि कन्नडमधल्या रजनीकांतच्या डब्ड सिनेमांनाही तेवढेच हाऊसफुल्ल असतात. विशेष म्हणजे रजनीकांतच्या वयाच्या 65 वर्षी रजनीकांतच्या अभिनयाचा जलवा कायम आहे.
सुपरस्टार रजनीकांत यांच्या कबाली चित्रपटाने बॉक्स आफिसवरील सगळे रेकॉर्ड तोडले आहेत..या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अवघ्या चार दिवसांमध्ये वर्ल्डवाईड तब्बल 400 कोटींचा गल्ला जमाविला आहे..
चार दिवसांमध्ये एवढी मोठी कमाई करणारा कबाली हा पहिला भारतीय सिनेमा ठरला आहे.. पहिल्या दिवशी 55 कोटींची बंपर ओपनिंग करत भारतीय सिनेमांचे अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. बॉक्स ऑफीसवर ‘कबाली’ची दुसऱ्या दिवशीची कमाई 45 ते 50 कोटी रुपये अपेक्षित आहे. तसेच प्रदर्शनाआधी कबालीने ब्रॅण्डिंग, म्युझिक आणि सॅटेलाईट्स राईट्समधून 260 कोटींची कमाई केली होती..
यासोबतच ‘कबाली’ने सलमान खानच्या ‘सुलतान’लाही मागे टाकलं आहे.‘सुलतान’ने पहिल्या दिवशी 36.54 कोटींचा गल्ला जमवला होता. तर कबालीने पहिल्याच दिवशी 55 कोटींची कमाई केली.
सुपरस्टार रजनीकांतच्या ‘कबाली’ने परदेशातही नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. पहिल्याच दिवशी ‘कबाली’ने अमेरिका, कॅनडा आणि मलेशियामध्ये 13 कोटींची कमाई केली. ‘कबाली’च्या हिंदी डबींगने पहिल्या दिवशी 5.2 कोटींची कमाई केली आहे. यापूर्वी हा विक्रम बाहुबलीच्या नावे होता. ‘बाहुबली’च्या हिंदी डबने 5 कोटींची कमाई केली होती..