निवडणुकीतील पराभवानंतर राज ठाकरेंची चुप्पी

नुकत्याच झालेल्या मुंबईसह दहा महापालिका निवडणुकीत मतदारराजने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला साफ नाकारले. 

Updated: Feb 26, 2017, 12:00 PM IST
निवडणुकीतील पराभवानंतर राज ठाकरेंची चुप्पी title=

मुंबई : नुकत्याच झालेल्या मुंबईसह दहा महापालिका निवडणुकीत मतदारराजने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला साफ नाकारले. 

राजाला साथ द्या या मनसेच्या निवडणुकीतील गाण्याप्रमाणे मुंबई महापालिकेत जनतेने मनसेचे सात नगरसेवक निवडून दिले. ज्या एकमेव महापालिकेवर मनसेची सत्ता होती त्या नाशिक महापालिकेत मनसेला अवघ्या 3 जागा मिळाल्या.

मनसेच्या या दारुण पराभवानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चुप्पी साधणे पंसत केलंय. अद्यापही राज ठाकरेंनी या पराभवाबाबत कोणतंच विधान केलेलं नाहीये.

प्रचार संपण्याच्या अवघ्या काही दिवस आधीच राज ठाकरेंनी प्रचारसभा घेण्यास सुरुवात केली. नाशिकमधील केलेल्या कामाचा दाखला देताना राज ठाकरेंनी जनतेला मतदानाचे आव्हान केले. 

मात्र प्रचारसभेला मोठी गर्दी जमवणाऱ्या जनतेने निवडणुकीत मात्र मनसेला नापसंती दिली. मुंबईत सात, उल्हासनगरमध्ये दोन तर पिंपरी-चिंचवडमध्ये मनसेला एक जागा मिळाली.