देर आए, दुरूस्त आए - राज ठाकरे

देर आए, दुरूस्त आए... अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राज्यातील ४४ टोल नाके बंद झाल्यावर प्रतिक्रिया दिली. टोल आंदोलनाचे फलित काय, असा प्रश्न विचारणा-यांना उत्तर मिळाले, असाही टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jun 9, 2014, 07:26 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
देर आए, दुरूस्त आए... अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राज्यातील ४४ टोल नाके बंद झाल्यावर प्रतिक्रिया दिली. टोल आंदोलनाचे फलित काय, असा प्रश्न विचारणा-यांना उत्तर मिळाले, असाही टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे.
राज्यातले 40 टोलनाके बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे.
यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे 34 टोलनाके बंद होणार आहेत. तसेच एमएसआरडीसीच्या 10 टोल नाक्यांचाही यात समावेश आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली आहे.
राज्यात एकूण 126 टोलनाके आहेत, त्यापैकी 44 टोलनाके बंद करण्य़ात आले आहेत, अजून 82 टोलनाके सुरू राहणार आहेत.
यातील जास्तच जास्त टोलनाके हे ग्रामीण भागातील आहेत. ग्रामीण भागात यापुढे निवडणुकीत फटका बसू नये, याचा विचार सरकारने केलेला दिसून येतोय.
तुमची कारही टोलमुक्त होण्याची शक्यता?
यापुढे लहान वाहनं कारमुक्त करण्याचा सरकारचा विचार असल्याचं सांगण्यात येतंय, टोलचा जो बोझा आहे. यापुढे जड वाहनांवर पडणार असल्याचं दिसतंय.
ज्या टोलनाक्यांचा कालावधी कमी आहे, असे टोल नाके बंद करण्यात सरकारने पुढाकार घेतला आहे. मात्र ज्या टोलनाक्यांचा कालावधी मोठा आहे, अशा टोल नाके अजुन सुरूच राहणार असल्याचं सांगण्यात येतंय.
एसटीला टोलमाफ
एमएसआरडीसी, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या टोल नाक्यांवर सर्वसामान्यांच्या एसटीला टोलमाफी देण्यात आली आहे.
टोलविरोधी आंदोलनाने सरकारची झोप उडवली आहे, तसेच लोकसभा निवडणुकीत जनतेने सरकारच्या तोंडाला पानं पुसल्याने सरकारने हा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.