महागाईविरोधातील मोर्चाला राज ठाकरेंची दांडी

वाढत्या महागाईविरोधात मनसेनं दादरमध्ये मोर्चा काढला. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. माटुंगा राजगड मुख्य कार्यालय ते दादर रेल्वे स्थानका पर्यन्त हा मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर या मोर्चाचं सभेत रुपांतर झालं. मनसेचे पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते. 

Updated: Oct 16, 2015, 07:51 PM IST
महागाईविरोधातील मोर्चाला राज ठाकरेंची दांडी title=

मुंबई : वाढत्या महागाईविरोधात मनसेनं दादरमध्ये मोर्चा काढला. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. माटुंगा राजगड मुख्य कार्यालय ते दादर रेल्वे स्थानका पर्यन्त हा मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर या मोर्चाचं सभेत रुपांतर झालं. मनसेचे पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मोर्चाचं नेतृत्व करणार होते. मात्र त्यांनी मोर्चाला अचानक दांडी मारली.  तत्पूर्वी राज ठाकरे यांनी कार्यालयात पदधिका-यांना मार्गदर्शन केले. 

तसंच प्रत्येक विभागात आंदोलन घेण्याचे आदेश ठाकरे यांनी पदधिका-यांना दिले. मात्र राज मोर्चाला का आले नाहीत असा प्रश्न कार्यकर्त्यांना नक्कीच पडला असेलच..

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.