राज ठाकरेंनी केली वाहतूक सेनेची सर्व पदे बरखास्त

मनसे वाहतूक सेनेची सर्व पदे बरखास्त करण्याचा निर्णय राज ठाकरेंनी घेतला आहे. वाहतूक सेनेबाबत अनेक तक्रारींनतर सर्व पदे बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Updated: Jan 10, 2013, 05:37 PM IST

www.24taas.com, मुंबई
मनसे वाहतूक सेनेची सर्व पदे बरखास्त करण्याचा निर्णय राज ठाकरेंनी घेतला आहे. वाहतूक सेनेबाबत अनेक तक्रारींनतर सर्व पदे बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर तसचं काहीदिवसापूर्वी राज ठाकरे यांनी रस्ते आणि आस्थापना सेनेच्या पदाधिकाऱ्यांनाही बरखास्त करून टाकलं होतं. राज ठाकरे यांच्या आदेशानंतर ही सारी पदे बरखास्त करण्यात आली आहे.
तर आज वाहतूक सेनेचीही सारी पदे बरखास्त करण्यात आली होती. परस्पर होणाऱ्या नेमणुका यांच्या वाढत्या तक्रारी राज ठाकरेंपर्यंत गेल्यानेच त्यांनी ही सारी पदे बरखास्त केली आहेत.
याआधीही राज ठाकरेंनी शब्दांत पदाधिकाऱ्यांना सुनावलं होतं. जर कोणी जुन्या पदांचा गैरवापर केल्यास त्याच्यावर पक्षांतर्गत कडक कारवाई करण्यात येईल असा सज्जड दमही भरण्यात आला होता. तसंच यापुढे अन्य संलग्न संस्थांमध्ये परस्पर नेमणुका होऊ नयेत, असे आदेशही देण्यात होते.