मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुंबईतल्या फेरीवाल्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतलीय. त्यांनी सर्वेक्षणाला विरोध केलाय.
राज ठाकरे यांनी आज मुंबईत फेरीवाले क्षेत्राची पाहाणी केली. यावेळी त्यांनी पालिकेच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित केला. फेरीवाल्यांचे कसले सर्वेक्षण करत आहात, असा सवाल करत फेरीवाला सर्वेक्षण बंद करा, असे ते म्हणालेत.
मुंबई महापालिकेतर्फे सुरू करण्यात आलेल्या फेरीवाला सर्वेक्षणाला मनसेचा विरोध असून, हे सर्वेक्षण थांबवण्यात यावे, अशी मागणी राज ठाकरेंनी केलीय. तर फेरीवाल्यांच्या प्रश्नावर शिवसेना गप्प का? असा बोचरा सवालही राज यांनी केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.