राज ठाकरेंना दिलं फूल, कारवाई होणार?

राज ठाकरे यांना मंचावर जाऊन फूल देऊन आभार मानणा-या पोलीस शिपायाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तावडे दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल,

Updated: Aug 22, 2012, 12:04 AM IST

www.24taas.com, मुंबई
राज ठाकरे यांना मंचावर जाऊन फूल देऊन आभार मानणा-या पोलीस शिपायाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तावडे दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिलीय. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आझाद मैदनावरील भाषणा दरम्यान पोलीस शिपाई प्रमोद तावडे यांनी थेट मंचावर जाऊन राज यांना पुष्प गुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन केलंय.
एवढंच नव्हे तर त्यांनी त्यांची व्यथाही राज ठाकरेंसमोर मांडली. तावडे यांच्यावर सीआयएसएफच्या जवानांनी हल्ला केला होता. त्यांनी इलाईट फोर्समध्ये बदली मागितली होती. मात्र त्याबाबत गृहमंत्री आर. आर. पाटील आणि पोलीस आयुक्त अरुप पटनायक यांनी साफ दुर्लक्ष केलं, मी न्यायापासून वंचीत राहिलो, अशी खंत तावडे यांनी व्यक्त केली.
पोलिस आयुक्त पटनायक यांनी तर नेताजी सुभाषचंद्र बोससारखा दिसतोस, असं बोलून चेष्टा केल्याचं तावडे यांनी सांगितलं. तावडे हे मुंबईत भायखळा वायरलेस विभागात कामाला आहेत.