www.24taas.com, मुंबई
मुंबईचे पोलीस आयुक्त अरुप पटनायक यांच्या बदलीचा प्रस्ताव गृहखात्यानं मुख्यमंत्र्यांकडं पाठवला आहे. तीन दिवसांपासून तो मुख्यमंत्र्याकंड पडून आहे. त्यावर मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेणार आहेत.
सीएसटी हिंसाचारावरुन पटनायक यांच्यावर राजकीय पक्षांकडून टीका होत आहे. शिवसेना आणि मनसेनं त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळं पटनायक आता काय निर्णय घेतात याकडं लक्ष लागलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गिरगावपासून आझाद मैदानावर काढलेल्या मोर्चाविरोधात कारवाई होणार आहे. पोलिसांनी मोर्चासाठी परवानगी नाकरली असतानाही राज ठाकरेंनी मोर्चा काढला त्यामुळं कायद्याचा भंग झाल्यानं त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त अरुप पटनायक यांनी दिली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी अरूप पटनाईक आणि आर. आर. पाटील यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली होती.