www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
लोकल प्रवासात महिलांची वाढती असुरक्षितता हा मुंबईकरांच्या काळजीचा विषय बनलाय. त्यासाठी रेल्वे पोलिसांनी सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला असला तरी हा निर्णय उफराटाच आहे. कारण संध्याकाळी सहा ते आठ या गर्दीच्या वेळी आणि तोदेखील फक्त दादर स्थानकात बंदोबस्त ठेवला जाणार आहे. त्यासाठी मुंबई पोलिसांची विशेष कुमकही रेल्वे पोलिसांनी मागवलीय. गर्दीच्या वेळेपेक्षा रात्री उशीरा आणि पहाटे प्रवास करणाऱ्या महिलांना सुरक्षा देण्याची अधिक गरज असताना त्याकडे मात्र दुर्लक्ष केल्याचं दिसतंय. तसंच दादरसारख्या कायम राबता असलेल्या स्टेशनपेक्षा छोट्या स्थानकांवर सुरक्षा कोण पुरवणार, हा प्रश्नच आहे.
दादरच्या या अकारण सुरक्षेचा आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी घेतलेला हा आढावा...