प्रवाशांनी आंदोलन मागे घ्यायचं सुरेश प्रभूंचं आवाहन

मध्य रेल्वे मार्गावर वारंवार होणाऱ्या समस्येमुळे बेजार झालेल्या संतप्त प्रवाशांनी बदलापूर स्थानकावर रेलरोको केला. 

Updated: Aug 12, 2016, 09:48 AM IST
प्रवाशांनी आंदोलन मागे घ्यायचं सुरेश प्रभूंचं आवाहन  title=

बदलापूर: मध्य रेल्वे मार्गावर वारंवार होणाऱ्या समस्येमुळे बेजार झालेल्या संतप्त प्रवाशांनी बदलापूर स्थानकावर रेलरोको केला. 

रोजच्या ट्रेनला नेहमीच उशिर होत असल्याने प्रवाशांच्या संतापाच आज उद्रेक झाला. सकाळी ५ वाजल्यापासून स्थानकात प्रवाशांनी रेल रोको केला. 

प्रवाशांचं हे आंदोलन थांबवण्याचं आवाहन रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी केलं आहे. रेल्वेचे जीएम, डीआरएम आणि बाकीच्या अधिकाऱ्यांना बदलापूरला पाठवण्यात आल्याची माहिती सुरेश प्रभूंनी ट्विटरवरून दिली आहे.