मुंबई : शीना बोरा हत्याकांडात राहुल मुखर्जीची यांची चौकशी करण्यात आली त्यात त्याने सांगितले की शीनाच्या हत्येनंतर त्याच्या मोबाईलवर पाच मेसेज आले होते. हे पाच मेसेज शीनाच्या मोबाईलवरून पाठविण्यात आले होते.
पोलीसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इंद्राणीनेच शीनाच्या मोबाइलवरून हे मेसेज राहुलला पाठविले होते. शीनाची हत्या २४ एप्रिल २०१२ रोजी झाली होती. त्यानंतर अनेक महिन्यांपर्यंत इंद्राणीने शीनाचा मोबाईल वापरला.
अधिक वाचा : इंद्राणी आणि पीटरच्या घरातून पोलिसांनी जप्त केली सुटकेस
पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, इंद्राणीने शीनाच्या मोबाइलवरून जे पाच मेसेज पाठविले ते पुढील प्रमाणे
- पहिला मेसेज : मी आता भारतात नाही. कृपया, मला शोधण्याचा प्रयत्न करू नका. ही योग्य वेळ आहे की आपण एकमेकांपासून दूर होऊ या. गु़ड बाय....
- दुसरा मेसेज : असे नाही आहे, मी तुझ्या भावनांचा विचार करत नाही. आता सर्व काही पहिल्यासारखं नाही. जे काही झालं त्यासाठी आपण दोन्ही जबाबदार आहोत. या सर्व गोष्टींतून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे. आपण वेगवेगळ्या मार्गांनी जायला हवे.
- तिसरा मेसेज : वेळेनुसार परिस्थिती बदलली आहे. मी जीवनात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. मला वाटते की तू आपल्या आयुष्यात माझ्यापेक्षा अधिक चांगल्या मुलीचे प्रेम मिळण्याची योग्यता ठेवतो.
अधिक वाचा : इंद्राणीनं मिखाईलला मारण्यासाठी दिली होती सुपारी, कॉन्ट्रॅक्ट किलर अटकेत
- चौथा मेसेज - मला अमेरिकेत दुसऱ्याशी प्रेम झाले आहे. मी त्याच्यासोबत आता सुखी जीवन जगू इच्छिते. दुसऱ्या कोणासोबत जाण्याचा निर्णय घेणे कठीण आहे. पण आता हे आपले भाग्य आहे. ईश्वर तुला खुश ठेवो.
- पाचवा मेसेज : यात कोणतीच शंका नाही की तू खूप प्रेम करणारा आणि माझी काळजी घेणारा होता. पण यापुढे यावर चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. मी आता पुढे तुझ्याशी बोलू शकत नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.