wwww.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज ठाकरे यांच्या आंदोलनाचा मंत्र्यांनीही मोठा धसका घेतला आहे. आर.आर.पाटील यांना मुंबईहून सांगलीला यायचं होतं, त्यांनी रेल्वेने मुंबई गाठली आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी भुजबळांनी नाशिकहून हेलिकॉप्टरने मुंबईला यायचं ठरवलं असल्याचं सांगण्यात येत आहे.
सर्व सामान्यांचं वाहन एसटीवर नाही, तर मंत्र्यांच्या गाड्यांची तोडफोड करा, असं वक्तव्य राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं होतं.
सुप्रिया सुळे यांच्या याच वक्तव्याचा आधार घेऊन, मग आता मंत्र्यांच्याच गाड्या फोडणार, असं राज ठाकरेंनी पुण्याच्या जाहीर सभेत म्हटलं होतं.
याचा धसका मंत्र्यांनी घेतला आणि वेगळी वाट गाठली की काय?, असा सवाल केला जात आहे. पुण्याच्या सभेनंतर मंत्र्यांच्या गाड्या फोडू नका, असंही मनसेकडून स्पष्ट करण्यात आलं होतं.
आंदोलन शांततेच्या मार्गाने करणार असल्याचं मनसेने म्हटलं आहे. सरकारने यानंतरही टोलवर निर्णय घेतला नाही, तर २१ तारखेला मंत्रालयावर मोर्चा नेणार असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.