अबब.. वांद्रे परिसरात आढळला १५ किलोंचा अजगर

 मुंबईतल्या उच्चभ्रू वांद्रे परिसरात आठ फुटा अजगर सापडल्यानं एकच खळबळ उडलालीय. तब्बल 15 किलो वजनाचा हा अजगर रात्री वांद्रे रेक्लमेशन भागात फिरायला गेलेल्या काही नागरिकांना दिसला.  त्याच नागरिकांनी पोलिसांना अजगराची माहिती दिली. 

Updated: Nov 30, 2015, 08:33 AM IST
अबब.. वांद्रे परिसरात आढळला १५ किलोंचा अजगर title=

मुंबई :  मुंबईतल्या उच्चभ्रू वांद्रे परिसरात आठ फुटा अजगर सापडल्यानं एकच खळबळ उडलालीय. तब्बल 15 किलो वजनाचा हा अजगर रात्री वांद्रे रेक्लमेशन भागात फिरायला गेलेल्या काही नागरिकांना दिसला.  त्याच नागरिकांनी पोलिसांना अजगराची माहिती दिली. 

पोलिसांनी सर्पमित्रांच्या मदतीनं अजगरला जेरबंद केलंय. सर्पमित्रांच्या मते नर अजगरासोबत असणारी मादी हाती आलेली नाही. विशेष म्हणजे वांद्रे रेक्लमेशनच्या या परिसरात वर्षभरात दहाहून अधिक अजगर सापडल्यानं मोठं आश्चर्य व्यक्त होतंय. 

काही दिवसांपूर्वीच्या खारघरमध्ये सहाव्या मजल्यावरील घरात अडीच फुटांचा नाग आढळला होता. तब्बल सहा दिवस नाग या घरात वास्तव्यास होता. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.