मुंबई : उद्या होणाऱ्या शिवस्मारकाच्या भूमीपूजनाला मच्छीमारांचा विरोध कायम असल्याचं स्पष्टीकरण मच्छीमार संघटनेचे नेते दामोदर तांडेल यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काळे झेंडे दाखवणार, असा इशारा त्यांनी दिला आहे.
मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात दिलेल्या आश्वासनानं समाधान झालेलं नसल्याचं मच्छिमार संघटनेचे नेते दामोदर तांडेल यांनी म्हटले आहे. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमाच्या वेळी मच्छीमार संघटना काळे झेंडे दाखवणार आहेत.
मच्छीमार संघटनेनं आमचा विरोध शिवस्मारकाला नसून, त्यासाठी समुद्रात घालण्यात येणाऱ्या भरावाला असल्याचं याआधीच स्पष्ट केले आहे.