प्रभादेवीत साकारलंय तंजावरचं बृहदीश्वर मंदिर

प्रभादेवी इथल्या धनमिल नाक्याची महालक्ष्मी यंदा तंजावरच्या हजारो वर्षे पुरातन अशा बृहदीश्वर मंदिरात विराजमान झाली आहे. क्षणाक्षणाला बदलणारी मंदिराची रोषणाई पहिल्या दिवसांपासूनच देवीभक्तांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारी ठरतेय. 

Updated: Oct 14, 2015, 05:02 PM IST
प्रभादेवीत साकारलंय तंजावरचं बृहदीश्वर मंदिर title=

मुंबई: प्रभादेवी इथल्या धनमिल नाक्याची महालक्ष्मी यंदा तंजावरच्या हजारो वर्षे पुरातन अशा बृहदीश्वर मंदिरात विराजमान झाली आहे. क्षणाक्षणाला बदलणारी मंदिराची रोषणाई पहिल्या दिवसांपासूनच देवीभक्तांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारी ठरतेय. 

शिवशक्ती नगर नवरात्रौत्सव मंडळाचं हे रौप्य महोत्सवी वर्ष संस्मरणीय करण्यासाठी मंडळाचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष प्रमोद केळुसकर यांनी भव्य दिव्य आणि पुरातन मंदिराची प्रतिकृती उभारण्याचा निर्धार केला आणि अवघ्या 15 दिवसांत ही प्रतिकृती साकारली.

आणखी वाचा - पाहा नवरात्रीचे ९ शुभ मुहूर्त, ९ दिवसात भाग्योदय

 

तामिळनाडूतील तंजावर इथं 1010 साली सम्राट राजेंद्र चोला यांनी उभारलेल्या ऐतिहासिक मंदिराची प्रतिकृती अवघ्या 15 दिवसांत साकारण्याचं आव्हान प्रसिद्ध कला दिग्दर्शक संजय पांचाळ यांच्यासमोर होतं. तब्बल 66 मीटर उंच असलेल्या या मंदिराची प्रतिकृती कमी जागेत आणि कमी कालावधीत साकारण्याचं आव्हान पांचाळ सहज पेललं. त्यांच्या 200 कामगार-कलाकारांनी अहोरात्र मेहनत करून हे मंदिर उभारलं आहे. 

त्यामुळं यंदा प्रभादेवीत नवरात्रौत्सवादरम्यान तंजावरचे शिव मंदिर अर्थात बृहदीश्वर मंदिर पाहाण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळणार हे निश्चित होते पण त्याचबरोबर मंदिराला लावण्यात आलेल्या एलइडी रोषणाईमुळं भक्तांच्या डोळ्याचं पारणं फिटलं आहे. या रोषणाईमुळे मंदिराच्या आसपासचा विभागही रंगात न्हाऊन निघाल्याचं मनमोहक दृश्य दिसतंय.

आणखी वाचा -  ९ दिवस नवरात्रीच्या व्रतासाठी या बाबी लक्षात ठेवा

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.