मुंबई : मुंबईत पावसाची संततधार राहताच अनेक ठिकाणी खड्डे दिसू लागलेत. प्रशासनाकडून करण्यात आलेला खड्डेमुक्त मुंबईचा दावा फोल ठरलाय.
इस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहनधारकांना खड्डयांचा सामना करावा लागतोय. पूर्व द्रुतगती मार्गावर चेंबूर येथे सुमारे १ किलोमीटरच्या अंतरामध्ये खड्डे पडले आहेत. निकृष्ट प्रतिचं काम केल्याची वाहनधारकांची तक्रार आहे.
सायनमध्येही अनेक ठिकाणी खड्डे दिसून येतायेत. त्यामुळे वाहतूक संथ गतीनं होतेय. अपघातही घडतायेत. दरवर्षीचा पावसाळा, दरवर्षीचे खड्डे हे चित्र कधी पालटणार असा सवाल विचारला जातोय.
पश्चिम एक्सप्रेस मार्गावरही काही वेगळं चित्र नाही. अनेक ठिकाणी खड्ड्यांचा सामना करावा लागतोय.
नुकत्याच सुरु झालेल्या दिंडोशी उड्डाणपुलावरच्या रस्त्याची तर २-३ दिवसाच्या पावसांत दुरावस्था झालीये. महापालिका अकार्यक्षम असल्याचाच हा पुरावा असल्याचं वाहनधारकांचं म्हणणं आहे.
पावसाच्या सुरुवातालीचा रस्त्याची ही दुर्दशा आहे अजून पूर्ण पावसाळा जाणे आहे. जोरदार पाऊस पडला तेव्हा काय स्थिती होईल याची चिंता मुंबईकरांना लागलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.