अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर खलबतं

लोकसभा निवडणुकांच्या रणनितीवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक आज मुंबईत होतीय.

Updated: Feb 23, 2014, 03:06 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
लोकसभा निवडणुकांच्या रणनितीवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक आज मुंबईत होतीय.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर ही बैठक होणार आहे.
माढा लोकसभा मतदारसंघातून विजय सिंह मोहिते पाटलांच्या उमेदवारीची घोषणा शरद पवार यांनी शनिवारी केलीय.
आता माढ्याचा तिढा सुटल्यानंतर नाशिक आणि सातारा या जागांवर आज खल होण्याची शक्यता आहे.
नाशिकमधून सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्याची पक्षाची योजना आहे. मात्र त्यात त्यांना रस नसल्याचं बोललं जातंय. तर समीर भुजबळांना पुन्हा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे.
साता-याचे खासदार उदयनराजे यांना पुन्हा उमेदवारी देण्यास काहींचा विरोध आहे. त्यामुळे शरद पवार काय निर्णय घेणार याकडे लक्ष आहे. तसेच बुलडाणा आणि अमरावती या जांगावरील उमेदवाराचा फैसलाही आजच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.