टँकर-पोलीस व्हॅनमध्ये अपघात, ३२ पोलीस जखमी

इतरांना सुरक्षा पुरविणारे पोलीसच असुरक्षित असल्याचं आज दिसून आलंय. सोमवारी रात्री उशीरा पोलीस व्हॅन आणि टँकरमध्ये झालेल्या अपघातात ३२ पोलीस जखमी झालेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 26, 2013, 09:38 AM IST

www.24taas.com, मुंबई
इतरांना सुरक्षा पुरविणारे पोलीसच असुरक्षित असल्याचं आज दिसून आलंय. सोमवारी रात्री उशीरा पोलीस व्हॅन आणि टँकरमध्ये झालेल्या अपघातात ३२ पोलीस जखमी झालेत.
वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर चकाल्यातल्या बिसलेरी कंपनीजवळ ही दुर्घटना घडलीय. वांद्र्याहून दहिसरकडे भरधाव वेगानं निघालेल्या टँकरनं समोरून येणाऱ्या पोलीस व्हॅनला धडक दिली. टँकरने धडक दिल्याने पोलीस व्हॅन वीजेच्या खांब्यावर जाऊन धडकली. या अपघातात ३२ पोलीस जखमी झालेत. जखमींमध्ये १० महिला पोलिसांचा समावेश आहे. या अपघातात पोलिसांना गंभीर जखमा झाल्या असल्या तरी जीवितहानी मात्र झालेली नाही.

दरम्यान, पोलिसांनी टॅंकर चालकाला अटक केलीय. जखमींना उपचारासाठी हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलंय.