मुंबई : आयपीएस अधिकारी सुनील पारसकर आरोपप्रकरणी चर्चेत असलेल्या मॉडेलच्या आधीच्या वकिलानं एक नवा खुलासा केलाय. ही मॉडेल हे सगळं एका रियालटी शो मध्ये प्रवेश मिळावा याकरिता करत असल्याचा आरोप मॉडेलच्या आधीच्या वकीलांनी केलाय. तसे पुरावेही त्यांनी क्राईम ब्रांचला दिलेत.
वकिल रिझवान सिद्दीक़ी यांनी हा आरोप केलाय. याबाबत रिझवान सिद्दीक़ी यांनी मुंबई क्राईम ब्रांचला पुरावेपण दिलेत. पुनम पांडे विषयी असेलला राग काढणायासाठी, त्या मॉडेलने हा बनाव केल्याचा आरोप रिझवान सिद्दीक़ी यांनी केलाय.
दरम्यान, आरोपात करण्यात आलेले आयपीएस अधिकारी सुनील पारसकर यांना सेवेतून निलंबित करण्याची मागणी, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शहा यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्याकडे केली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.