दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर आयपीएल चोळणार मीठ

आयपीएल सामन्यांसाठीचं पिच तयार करण्यासाठी लाखो लीटर पाण्याची गरज आहे. या संदर्भात केतन तिरोडकर यांनी न्यायालयात याचिका सादर केलीय. आयपीएल सामने महाराष्ट्रात आयोजित करायचे असतील तर आयपीएल प्रशासनाला राज्य सरकारने प्रत्येक लीटर मागे एक हजार रूपये पाणी कर आकारावा अशी मागणी करण्यात आलीय. 

Updated: Apr 5, 2016, 06:20 PM IST
दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर आयपीएल चोळणार मीठ title=

मुंबई : आयपीएल सामन्यांसाठीचं पिच तयार करण्यासाठी लाखो लीटर पाण्याची गरज आहे. या संदर्भात केतन तिरोडकर यांनी न्यायालयात याचिका सादर केलीय. आयपीएल सामने महाराष्ट्रात आयोजित करायचे असतील तर आयपीएल प्रशासनाला राज्य सरकारने प्रत्येक लीटर मागे एक हजार रूपये पाणी कर आकारावा अशी मागणी करण्यात आलीय. 

राज्यात मुंबई, नवी मुंबई आणि पुणे इथे आयपीएल सामने खेळवले जातात. 2013 मध्ये आयपीएल सामन्यांसाठी या 3 स्टेडियमवर 65 लाख लीटर पाणी केवळ पीच तयार करण्यासाठी वापरण्यात आले. तेवढंच पाणी यावर्षीही वापरावं लागणार आहे. त्यामुळे सध्याची दुष्काळी स्थिती लक्षात घेता हे सामने आयोजित करायचे झाल्यास आयपीएल प्रशासनाला लीटर मागे 1000 रूपये पाणीकर आकारावा अशी मागणी करण्यात आलीय. तसंच दुष्काळग्रस्त भागातल्या कुटुंबांना दररोज 1000 लीटर पाण्याचा पुरवठा करावा अशी मागणीही करण्यात आलीय.