तळोजाच्या एमआयडीसीमध्ये पेट्रो-केमिकल कंपनीला भीषण आग

नवी मुंबईतल्या तळोजा एमआयडीसीमधील तळोजा पेट्रोकेमिकल कंपनीला आज सकाळी भीषण आग लागली. ही आग इतकी भयानक होती की या आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली. मात्र सुदैवानं या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Dec 2, 2013, 07:01 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी मुंबई
नवी मुंबईतल्या तळोजा एमआयडीसीमधील तळोजा पेट्रोकेमिकल कंपनीला आज सकाळी भीषण आग लागली. ही आग इतकी भयानक होती की या आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली. मात्र सुदैवानं या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही.
आगीची माहिती मिळताच, घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशामक दलाच्या आठ गाड्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. कंपनीच्या पहिल्या माळ्यावर आज सकाळी शॉर्ट सर्किटमुळं आग लागली. मात्र कंपनीमध्ये आगरोधक प्रणाली कार्यान्वित नसल्यानं आग पसरून बॉयलरपर्यंत पोहोचली. आगीचा एकच भडका उडून आग पाहता पाहता संपूर्ण कंपनीमध्ये पसरली.
ही कंपनी पेट्रो-केमिकलपासून वस्तू बनवत असल्यामुळं या कंपनीमध्ये फर्निश ऑईल आणि ल्युब ऑईलचा साठा मोठ्या प्रमाणात साठवून ठेवण्यात आला होता. त्यामुळं आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्रास होत असल्याचं तळोजा अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.