शिपाई अविनाश चोगले ५०व्या वर्षी दहावी पास, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

मंत्रालयात शिपाई म्हणून काम करणारे अविनाश चोगले हे वयाच्या ५०व्या वर्षी दहावी पास झाले आहेत. २८व्या प्रयत्नात त्यांनी हे यश मिळवलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास पेढा भरवून त्यांचं अभिनंदन केलं. 

Updated: Jun 9, 2015, 11:07 PM IST
शिपाई अविनाश चोगले ५०व्या वर्षी दहावी पास, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन title=

मुंबई: मंत्रालयात शिपाई म्हणून काम करणारे अविनाश चोगले हे वयाच्या ५०व्या वर्षी दहावी पास झाले आहेत. २८व्या प्रयत्नात त्यांनी हे यश मिळवलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास पेढा भरवून त्यांचं अभिनंदन केलं. 

अविनाश चोगले यांनी १९८७मध्ये पहिल्यांदा १० वीची परीक्षा दिली. तेव्हा ते हिंदी, इतिहास-भूगोल, इंग्रजी आणि गणित या विषयांमध्ये नापास झाले होते. १९९४पर्यंत त्यांनी गणित वगळता सर्व विषय सोडवले आणि अखेर २८व्या प्रयत्नात गणितात पास होवून ते १०वी उत्तीर्ण झाले. 

मंत्रायलात शिपाई म्हणून काम करत असून त्यांना आता क्लार्क व्हायचं आहे. तशी संधीही त्यांना आहे. त्यासाठीच ते पुढे तयारी करत आहेत. 
 
अविनाश चोगले हे सुरुवातीच्या काळात ते सकाळी मासे विकायचे आणि त्यानंतर ते मंत्रालयात कामाला यायचे. १९९०ला ते मंत्रालयात आरोग्य विभागात नोकरीला लागले. सध्या मुख्यमंत्री कार्यालयात ते शिपाई पदावर आहेत. २०१६ला ते निवृत्त होणार आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.