'बालहट्टामुळे पेंग्विनचा मृत्यू'

राणीच्या बागेतल्या पेंग्विनच्या मृत्यूप्रकरणी काँग्रेस नेते आणि आमदार नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर नाव न घेता टीका केली आहे.

Updated: Oct 23, 2016, 10:56 PM IST
'बालहट्टामुळे पेंग्विनचा मृत्यू' title=

मुंबई : राणीच्या बागेतल्या पेंग्विनच्या मृत्यूप्रकरणी काँग्रेस नेते आणि आमदार नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर नाव न घेता टीका केली आहे. बालहट्टामुळे या पेंग्विनचा मृत्यू झाल्याचं नितेश राणे म्हणाले आहेत.

मुंबईतील जिजामाता प्राणीसंग्रहालय म्हणजेच राणीच्या बागेत 4 नर आणि 4 मादी पेंग्विन आणले होते. यातल्या कोरियातून आणलेल्या मादी पेंग्विनचा मृत्यू झाला. यकृतात संसर्ग झाल्यामुळे, या मादी पेंग्विनवर उपचार सुरु होते.

दरम्यान इतर 3 नर आणि 4 मादी पेंग्विन निरोगी असल्याचं सांगण्यात आलंय. थंड हवामानात आढळणारे पेंग्विन मुंबईत आणणं हे युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचं स्वप्न होतं. पेंग्विनना मुंबईतलं वातावरण मानवेल का, यावर त्यावेळी बरेच तर्कवितर्क लढवले गेले होते.