पेटीएम एप्लिकेशनवर देणार पासवर्ड सेवा

पेटीएम ग्राहकांचा पैसा सुरक्षित ठेवणयासाठी पिन, पासवर्ड, पॅटर्न किंवा फिंगरप्रिंटची सुरक्षा एप्लिकेशन सुविधा देणार आहे. ही एप्लिकेशन पासवर्ड सुविधा भविष्यात नवनवीन अॅड्रॉइड अॅपमध्ये उपलब्ध होणार आहे.

Updated: Dec 10, 2016, 07:01 PM IST
पेटीएम एप्लिकेशनवर देणार पासवर्ड सेवा title=

मुंबई: पेटीएम ग्राहकांचा पैसा सुरक्षित ठेवणयासाठी पिन, पासवर्ड, पॅटर्न किंवा फिंगरप्रिंटची सुरक्षा एप्लिकेशन सुविधा देणार आहे. ही एप्लिकेशन पासवर्ड सुविधा भविष्यात नवनवीन अॅड्रॉइड अॅपमध्ये उपलब्ध होणार आहे.

ग्राहक सेटिंग मेनूमध्ये सिक्युरिटी ऑपशनचा वापर करून मोबाईलचा डिफॉल्ट अॅड्रॉइड सिक्युरिटी पासवर्ड सेट करू शकतात. त्यानंतर पिन, पासवर्ड, पॅटर्न किंवा फिंगरप्रिंट यातील एक निवडक ऑपशनने मोबाईल सुरक्षित ठेवता येऊ शकेल, तसेच सुविधा बंद करावयाची असल्यास त्यासाठी ही तरतुद करण्यात आली आहे.

ग्राहकांचा पैसा सुरक्षित करणं हे आमच्यासाठी महत्वाचं आहे. त्यामुळे पासवर्ड सुविधा उपयोगात आणण्यासाठी पावलं उचलली जात आहेत, अशी प्रतिक्रिया पेटीएमचे वरिष्ठ उपाध्यक्ष दीपक एबोट यांनी दिली आहे.

ग्राहकांचा मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला तरी पेटीएम वॉलेटची सुरक्षा एप्लिकेशनच्या माध्यमातून होणार आहे. नोटाबंदीनंतर देशात मोठ्याप्रमाणावर पेटीएमचा वापर टॅक्सी भाडे, ऑटो, पेट्रोलपंप, किरकोळ व्यापारी, हॉटेल्स, कॉफी शॉप, मल्टिप्लेक्स, पार्किग अशा अनेक ठिकाणी होत आहे. त्यामुळे पेटीएम मधला ग्राहकांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी सिक्युरिटी ऑप्लिकेशन महत्वाचे आहे.