पंकजा मुंडे छगन भुजबळांना भेटल्या

राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची भेट घेतली आहे. छगन भुजबळ सध्या तुरूंगवासात असले, तरी त्यांना डेंग्यू झाल्यामुळे त्यांच्यावर जेजे रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Updated: Sep 21, 2016, 12:35 PM IST
पंकजा मुंडे छगन भुजबळांना भेटल्या title=

मुंबई : राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची भेट घेतली आहे. छगन भुजबळ सध्या तुरूंगवासात असले, तरी त्यांना डेंग्यू झाल्यामुळे त्यांच्यावर जेजे रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 

भाजप नेत्या आणि गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनी छगन भुजबळांची जेजे रूग्णालयात जाऊन भेट घेतली. 

जी राजकीय वर्तुळात अजिबात अपेक्षित नव्हती, पंकजा मुंडे यांनी छगन भुजबळ यांची प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेतली असली, तरी या भेटी मागचं नेमकं कारण काय याविषयी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ही भेट असल्याचं सांगण्यात येत आहे.