अभिनेत्रीकडून सामूहिक बलात्काराचा आरोप, निर्माता अटकेत

चित्रपट निर्माता आणि त्याच्या मित्रांनी आपल्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोपी एका महिलेनं केला आहे. 

Updated: Feb 20, 2016, 02:38 PM IST
अभिनेत्रीकडून सामूहिक बलात्काराचा आरोप, निर्माता अटकेत title=

मुंबई: चित्रपट निर्माता आणि त्याच्या मित्रांनी आपल्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोपी एका महिलेनं केला आहे. ही महिला पाकिस्तानी अभिनेत्री आहे. याप्रकरणी पोलिसांनी भोजपुरी चित्रपटाचा निर्माता-दिग्दर्शक शाम चरण यादवला अटक केली आहे. 

मुंबईमध्ये आम्ही दोघं भेटलो, त्यानंतर एकमेकांना आम्ही मोबाईल नंबर दिला, आणि सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून जवळ आल्याचं या अभिनेत्रीनं पोलिसांना सांगितलं आहे.

डॉक्यूमेंट्री बनवण्याच्या नावाखाली त्यानं माझ्याकडून 36 लाख रुपये घेतले, पण वर्षभर डॉक्यूमेंट्री बनवलीच नाही. त्यामुळे याबाबत मी त्याला वारंवार विचारणा केली आणि पैसे परत करायला सांगितले. तेव्हा त्यानं मला मुंबईला बोलावलं.

मुंबईत त्यानं मला एका लॉजवर भेटायला बोलावलं, आणि त्याच्यासह आणखी दोघांनी माझ्यावर सामूहिक बलात्कार केला आणि त्याची व्हिडिओ क्लिप बनवली असा आरोप या महिलेनं केला आहे.  पैसे मागितले तर ही क्लिप इंटरनेटवर अपलोड करण्याची धमकी दिल्याचंही तिचं म्हणण आहे. 

याप्रकरणी पोलिसांनी जोगेश्वरीमधून शाम चरण यादवला अटक केली आहे, तर त्याच्या 2 मित्रांचा शोध सुरु आहे.