ऑनलाइन अॅडमिशनच्या जागा वाढीचं नेमकं वास्तव...

दहावीचा निकाल काही दिवसांत लागेल. मात्र त्याआधी आता पालक विद्यार्थ्यांना टेंशन आलंय ते ऑनलाईन अॅडमिशनचं. प्रवेशाच्या जागा वाढल्याचा गाजावाजा शिक्षण विभागाने केलाय. मात्र यातलं वास्तव नेमकं काय आहे पाहूया हा रिपोर्ट

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 18, 2017, 10:21 PM IST
ऑनलाइन अॅडमिशनच्या जागा वाढीचं नेमकं वास्तव...  title=

दिपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई : दहावीचा निकाल काही दिवसांत लागेल. मात्र त्याआधी आता पालक विद्यार्थ्यांना टेंशन आलंय ते ऑनलाईन अॅडमिशनचं. प्रवेशाच्या जागा वाढल्याचा गाजावाजा शिक्षण विभागाने केलाय. मात्र यातलं वास्तव नेमकं काय आहे पाहूया हा रिपोर्ट

दहावीची परीक्षा दिलेल्या लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना सध्या अकरावी प्रवेशाचे वेध लागलेत. येत्या काही दिवसाच ११ वीची ऑनलाईन प्रवेशाची प्रक्रिया सुरु होणारेय

किती आहे जागा....

यंदा ११ वी प्रवेशासाठी आर्ट्स, सायन्स, कॉमर्ससाठी तब्बल २ लाख ९२ हजार ९० इतक्या प्रवेशाच्या जागा आहेत. तर गेल्यावर्षी २ लाख ७८ हजार २८२ प्रवेशाच्या जागा होत्या. यातून तब्बल ५६ हजार प्रवेशाच्या जागा गेल्यावर्षी रिक्त राहिल्या. 

यंदा राज्य सरकारने १७ नविन महाविद्यालयांना मान्यता दिलीय त्यामुळे १३ हजार ८०८ नविन प्रवेशाच्या जागा उपलब्ध झाल्या आहेत. पण गेल्यावर्षी ५६ हजार जागा रिक्त राहील्याने याही वर्षी जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.
 

गेल्यावर्षी ११ वीत १०० टक्के प्रवेश पूर्ण झाले होते. म्हणजेच एकही विद्यार्थी प्रवेशाविना वंचित राहीला नाही. विद्यार्थी कमी आणि महाविद्यालये अधिक अशी परिस्थिती असल्याने मुंबईत अनेक कनिष्ठ महाविद्यालये बंद होण्याच्या मार्गावर आहेत. 

सरकारी अनुदानित कनिष्ठ महाविद्यालये ओस पडली असताना नविन महाविद्यालयांना परवानगी का आणि कशी दिली गेली असा सवाल आता विचारला जातोय.