मुंबई : इतर मागासवर्गीय समाजसाठी (ओ.बी.सी.) गुड न्यूज आहे. शैक्षणिक सवलतीकरिता सध्या उत्पन्नाची मर्यादा थेट ६ लाखांपर्यंत वाढविण्यात येरणार आहे.
ओ.बी.सी.साठी शैक्षणिक सवलतीकरिता सध्या उत्पन्नाची वार्षिक मर्यादा ही साडेचार लाख रुपये आहे. मात्र, ही मर्यादा वाढविण्याची मागणीत करण्यात आली. ही मागणी लक्षात घेता ही मर्यादा सहा लाख रुपयांपर्यंत वाढविण्याचा निर्णय तात्काळ घेतला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत स्पष्ट केले.
सामाजिक न्याय खात्याच्या मागण्यांवरील चर्चेत ओबीसी क्रिमिलेअरची मर्यादा वाढविण्याची मागणी सदस्यांकडून करण्यात आली होती. यावर ही मर्यादा वाढविण्याचा सरकारचा विचार असल्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी स्पष्ट केले.
विधानसभेत सदस्यांचे समाधान झाले नाही. ओबीसीसाठी शैक्षणिक सवलतीकरिता उत्पन्नाची मर्यादा वाढविण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी भाजपचे डॉ. संजय कुटे यांनी केली असता ही मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली.