मुंबई : मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने आता चिंताजनक आणि तितकीच धक्कादायक ही बातमी आहे. मुंबईतल्या गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात वर्षभरात सुमारे ५३२ एमडीआर टीबी रुग्ण आढळल्याची माहिती मिळतेय.
यापैंकी २३६ महिला रुग्ण आहेत. गोवंडीत इतक्या मोठ्या प्रमाणात एमडीआर टीबी रुग्ण आढळले असले तरी पालिका रुग्णालयात केवळ एक ऑनररी डॉक्टर टीबी रुग्णांना तपासतो.
गोवंडीमध्ये वाढत चाललेली टीबी रुग्णांची संख्या ही आता धोक्याच्या पातळीनजीक असताना याला आळा घालण्यासाठी फारसे प्रयत्न होताना मात्र दिसत नाहीत.
मुंबईत दरवर्षी सुमारे पन्नास हजार टीबी रुग्ण आढळतात. त्यातील, जवळपास पाच हजार रुग्ण हे एमडीआर टीबीला बळी पडलेले असतात. टीबीच्या उच्चाटनासाठी पालिका विविध पातळ्यांवर प्रयत्न करत असल्याचं सांगत असली तरी गोवंडी भागामध्ये टीबीचे रूग्ण सर्वाधिक संख्येने आढळूत येत आहेत.
टीबी रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवूनच मुंबई महापालिकेच्या क्षयरोग नियंत्रण अभियानाच्या ब्रॅण्ड एम्बसिडरची जबाबदारी अभिनेता अमिताभ बच्चन यांनी स्विकारली आहे. उल्लेखनीय म्हणजे, नुकतंच खुद्द अमिताभ यांनीही आपल्याला टीबी झाला होता आणि त्यावर आपण यशस्वीपणे मात केल्याचं कबूल केलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.