आता म्हाडाची घरंही द्या अधिकृतरित्या भाड्यानं!

म्हाडाच्या नव्या निर्णयानं म्हाडाच्या घरात राहणाऱ्या भाडेकरुंना दिलासा मिळालाय. म्हाडाची घरं आता भाड्यानं देता येणार आहेत. मात्र, त्यासाठी म्हाडाची पूर्वपरवानगी असणं आवश्यक असणार आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 7, 2013, 09:40 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
म्हाडाच्या नव्या निर्णयानं म्हाडाच्या घरात राहणाऱ्या भाडेकरुंना दिलासा मिळालाय. म्हाडाची घरं आता भाड्यानं देता येणार आहेत. मात्र, त्यासाठी म्हाडाची पूर्वपरवानगी असणं आवश्यक असणार आहे. म्हाडाच्या जागेवरील ‘एसआरए’ योजना आता म्हाडा स्वत:च राबवणार आहे. यासंदर्भातला निर्णय हा म्हाडाच्या बोर्ड मिटींगमध्ये घेण्यात आलाचं समजतंय.
म्हाडाची घरे ही निवाऱ्याची आवश्यकता असलेल्या गरजूंसाठी असल्यामुळे ती भाड्याने देता येणार नाही तसंच पाच वर्षापर्यंत विकताही येणार नाही, असं धोरण म्हाडानं स्वीकारलं होतं. परंतू, अनधिकृतरित्या म्हाडाच्या घरांत सध्याही अनेक भाडेकरू कागदोपत्री कराराविनाच राहत असल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे म्हाडाची फसवणूकच होत होती. तसंच या अटीमुळे अनेक जणांनी घरं मिळूनही सोयीस्कर नसल्यानं आपली घरं बंदही ठेवली होती. मुंबईत सध्या ८० हजार घरे टाळेबंद असल्याचा अहवाल `लिआसेस अॅण्ड फ्लोरा` या संस्थेने अलीकडेच जाहीर केलं होतं.

याच गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी येत्या पाच वर्षात दहा लाख घरांचे उद्दिष्ट ठेवून राज्य सरकारने पुनर्विकासाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सदनिका उपलब्ध करण्यासाठी विकास नियंत्रण नियमावलीत बदल जाहीर केले. याचा पुढचा टप्पा म्हणून म्हाडाची घरे भाड्याने देण्याबाबत धोरणात्मक निर्णय जाहीर करण्यात आला. म्हाडाची घरे अधिकृतपणे भाड्याने देता येणार असल्यामुळे स्टँप ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फीच्या माध्यमातून सरकारलाही याचा फायदा होणार असल्याचे मत एका सरकारी अधिकाऱ्याने व्यक्त केले. नव्या धोरणावर म्हाडाने आता शिक्कामोर्तब करण्याची नाममात्र औपचारिकता शिल्लक आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.