www.24taas.com, झी मीडिया,मुंबई
अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. अरबी समुद्रात पुतळा उभारण्यास ग्रीन सिग्नल मिळाला आहे. महाराष्ट्र कोस्टल झोन व्यवस्थापन प्राधिकरणाने (एमसीझेडएमए) शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यास तशी परवानगी दिलेय. तसेच ठाकरे यांचा स्मृती चौथरा उभारण्याचा मार्ग मोकळा झालाय.
अरबी समुद्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिवस्मारक उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबत मुंबईत एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत समुद्रात पुतळा उभारण्याबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीत शिवस्मारक आणि मुंबईतील शिवाजी पार्कवरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती चौथऱ्याबाबत चर्चा झाली.
राज्याचे पर्यावरण प्रधान सचिव ए. राजू यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. समुद्रात शिवाजी महाराज्यांचा पुतळा उभारणीस हरकत नसल्याचे प्राधिकरणाच्या स्पष्ट करण्यात आले. तसेच शिवसेनाप्रमुखांवर अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या शिवाजी पार्कवरील जागेवर स्मृती चौथरा उभारण्यास हिरवा कंदील दाखविण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.
अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिवस्मारक उभारणीस राज्याच्या पर्यावरण विभागाचा हिरवा कंदील दिल्याचे या बैठकीनंतर स्पष्ट झाले आहे. शिवाजी पार्कवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती चौथरा उभारण्याचा मार्ग देखील मोकळा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.