लाल दिव्याच्या गाडीचा मोह काही सुटेना...

लाल दिव्याची गाडी मिळवण्यासाठी आयुष्यभर स्वप्न पाहणाऱ्या राजकीय नेत्यांना जर ते पद मिळूनही गाडीवरून लाल दिवा काढण्याची वेळ आली तर... अशीच वेळ आलीय मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांच्यावर...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 29, 2014, 11:58 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
लाल दिव्याची गाडी मिळवण्यासाठी आयुष्यभर स्वप्न पाहणाऱ्या राजकीय नेत्यांना जर ते पद मिळूनही गाडीवरून लाल दिवा काढण्याची वेळ आली तर... अशीच वेळ आलीय मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांच्यावर...
मुंबई महानगरपालिकेच्या महापौरांसह राज्यातील सर्व महापौरांना गाडीवरील लाल दिवा काढण्याचे आदेश राज्य सरकारनं दिलेत. परंतु सरकारच्या या आदेशावर मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांनी नाराजी व्यक्त केलीय. 
महापौरांना राज्यमंत्री पदाचा दर्जा असताना राज्य सरकार जाणीवपूर्वक आपल्याला डावलत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला गाडीवर लाल दिवा लावण्या संदर्भात वर्गवारी तयार करण्यास सांगितलं होतं. त्यानुसार राज्य सरकारनं राज्य सरकारमधील कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री आणि मुख्य सचिवांना लाल दिवा तर महापौरांना पिवळा दिवा अशी वर्गवारी केली.
महापौर सुनिल प्रभूंनी मात्र याचा निषेध व्यक्त मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांना पत्र लिहून लाल दिवा कायम ठेवण्याची विनंती केलीय.

व्हिडिओ पाहा -

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.